लोणीकंद परिसरातील सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

पुणे : विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे जिल्ह्यातुन दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ , तीनच्या पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी याबाबतचा आदेश दिला. पंकज काळुराम शिंदे (वय २६ वर्षे, रा. फुलगाव ता. हवेली जि. पुणे) असे तडीपार केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद परिसरातील फुलगाव तसेच पेरणे फाटा, आळंदी फाटा भागात दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणाया तसेच त्यांची लुट करणाया सराईत गुन्हेगारामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयक संभ्रम निर्माण होवु नये तसेच सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सदर इसमावर सहा. पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस
निरीक्षक गुन्हे  राजेंद्र तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, पोलीस नाईक कापुरे, पोलीस अंमलदार सागर कडु, तुषार पवार यांनी सदर सराईत इसम याचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसम यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे
तडीपार करणेबाबत पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख यांना प्रस्ताव  पाठविला होता. त्यानुसार, त्यांनी तिडके यास दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.