पोलिसांना खूनाची बातमी देणारेच निघाले खूनी, शिवाजीनगर पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : शिवाजीनगर येथील खुडे ब्रिजखाली एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता. वैद्यकीय अहवालानुसार या इसमाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. दरम्यान, या खूनाची बातमी देणारेच या खूनी असल्याचे तपासातून समोर आले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणत दोघांना ताब्यात घेतले आहे.

महेश शिवाजी देव उर्फ तंबी (वय 30, रा.खुडे ब्रिजजवळ शिवाजीनगर, पुणे) आणि आकाश प्रकाश यादव (वय 33, रा. नवी शनिवार पेठ, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात तरूणाचा खून झाला होता. त्यानुसार तपास पथकाने खूनाचा तपास सुरू केल्यानंतर 255 सीसीटीव्ही फुटेज बघुन, तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच रस्त्यावर कचरा वेचणारे, भंगाराचे दुकानदार, भीक मागणारे तसेच गोपनीय बातमीदार असे तब्बल 70 ते 75 लोकांकडे चौकशी केली. परंतु कोणतेही धागेदोरे हाती आले नाहीत. तपास किचकट होत जात असताना काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी दारू पिण्याच्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस निरिक्षक विक्रम गौड, अर्जुन नाईकवाडे, अविनाश भिवरे, रणजित फडतरे, बशिर सय्यद, रुपेश.वाघमारे, कांतीलाल गुंड, संतोष मेमाणे, शरद राऊत, अनिकेत भिंगारे, राहुल होळकर यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.