निगडीत पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर खुनी हल्ला

पिंपरी चिंचवड : अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला  केला, तसेच परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 28) रात्री साडेनऊच्या सुमारास ओटास्किम, निगडी येथे घडली.

याप्रकरणी दीपक पवार (वय 22, रा. ओटास्किम, निगडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहानवाज मुस्ताक शेख (वय 17, रा. ओटास्किम, निगडी) असे जखमी मुलाचे नाव आहे. यासंदर्भात त्याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हा घरी असताना शेख याचा एक अल्पवयीन मित्र घरी आला. त्याने ‘बाहेर फिरायला जाऊ’ असे म्हणून फिर्यादीला घराबाहेर नेले. अंकुश चौक येथील भाजी मंडईच्या पाठीमागे नेत मित्राने आणि त्याच्या तीन साथीदारांनी मिळून जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

दरम्यान, दीपक पवार याने कोयत्याने डोक्यात मारून फिर्यादीवर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर आरोपींनी भाजी मंडई परिसरात दहशत निर्माण केली. त्या दहशतीमुळे लोकांनी त्यांची दुकाने व टप-या बंद केल्या. याप्रकरणी निगडी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.