पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने कोरोना महामारीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचा सत्कार

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने प्रभाग क्र.२१ व २२ मधील नागरिकांसाठी श्रीगणेश महोत्सव स्पर्धा-२०२१ आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये घरगुती गणपती सजावट, गौरी गणपती सजावट, रांगोळी स्पर्धा, महेंदी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचा बक्षिस
वितरण समारंभ व कोरोना महामारीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर, पत्रकार, महावितरणचे कर्मचारी, सफाई कामगार, आशा वर्कर,
कीटकनाशक धूर फवारणी करणारे, घरगुती गैस वितरक करणारे कर्मचारी व पोलिस मित्र संघटनेचे कर्मचारी यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी विधानसभेचे उपविभाग अध्यक्ष आकाश लांडगे, महिला उपशहरध्यक्षा अनिता पांचाळ, बालाजी पांचाळ, वैशाली बोत्रे, रोहीत थरकुडे, किरण वाघेरे, अक्षय सोरटे, आकाश पांचाळ यांनी केले होते. बक्षिस वितरण समारंभाप्रसंगी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष/नगरसेवक सचिन चिखले, मनसेच्या प्रथम महिला नगरसेविका अश्विनी चिखले, महिलाशहर शहरअध्यक्ष अश्विनी बांगर व पिंपरी चिंचवड मधील मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते म्हणाले की, कोरोना अजुन पूर्णपणे संपलेला नाही. नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे,
घरच्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे, रोज मास्क व सेनिटिजायरचा वापर केलाच पाहिजे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते हे तुमच्यासाठी अहोरात्र काम करत असतात त्यांना ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाठिंबा द्यावा ही इच्छा व्यक्त केली.

आयोजक पिंपरी विधानसभेचे उपविभाग अध्यक्ष आकाश लांडगे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे कोरोनाच्या नावाखाली रोज विन नियमावली आणणे, हिंदुच्या सणांवरती निबंध लावणे, दहिहंडी होऊ न देणे यामध्ये लोकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. अशा प्रकाराला थांबवण्यासाठी व लोकांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आम्ही श्रीगणेश महोत्सव स्पर्धेचे आयोजन केले. जेणेकरून नागरिकांनी उत्साहात आपले सण साजरे केले पाहिजेत. त्यानंतर विजेते झालेले तरुण मुले, मुली, महिलांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सहभागी झालेल्या असंख्य नागरिकांना प्रशस्तीपत्रक व भेटवस्तु देण्यात आल्या.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.