वाकडमध्ये ‘स्पा सेंटर’च्या नावाखाली चालू होता वेश्याव्यवसाय ; एका महिलेची सुटका

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड परिसरातील स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या अटक करण्यात आली आहे. तर तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई  बुधवारी (दि. 29) दुपारी भुमकर चौक, वाकड येथील क्रॉसरोड मॉल येथे करण्यात आली.

रोहिदास बाबाजी आढाव (वय 21, रा. पवारनगर काळेवाडी. मूळगाव सांगवी सूर्या ता. पारनेर जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे. याबाबत एका महिलेने बुधवारी (दि. 29) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुमकर चौक, वाकड येथील क्रॉसरोड मॉल येथील EVANTEE SPA UNISEX सेंटरमध्ये स्पाचे नावाखाली जबरदस्तीने मुलींकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी आरोपी ३ महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या कडून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करवून घेत होते.

या कारवाईत पोलिसांनी ४ हजार ७२० रुपये रोख रक्कम, ७ हजार रुपये किमतीचा अॅण्ड्रॉईड मोबाईल, ३० रुपये किमतीचे इतर साहित्य असा एकूण ११ हजार ७५९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन रोहिदास बाबाजी आढाव याला अटक केली.  वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.