सोसयटीच्या सीसीटीव्ही कॅमे-याद्वारे महिलेवर पाळत, पिंपरी चिंचवड मधील धक्कादायक प्रकार

पिंपरी चिंचवड :  महिलेच्या बेडरूमच्या दिशेने सीसीटीव्ही कॅमेरा लावून  पाळत ठेवत, तिचे खासगी व्हिडीओ बनवून  पाहिले. महिलेने सीसीटीव्ही कॅमेरा काढण्यास सांगितले असता त्यासाठी नकार दिला. याप्रकरणी सोसायटीच्या चेअरमन, सेक्रेटरी व खजिनदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 5 ते 28 सप्टेंबर या कालावधीत  हिंजवडी- वाकडरोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडला.

सोसायटीचे चेअरमन गणेश शंकर आवटे, सेक्रेटरी सागर शिंदे आणि खजिनदार देवेंद्र सारंगधर या तीन आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. याप्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी (दि. 30) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी महिला व आरोपी हे एकाच सोसायटीत राहतात. या तीनही आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्या बेडरुममधील चित्रीकरण होऊ शकेल, अशा पद्धतीने बेडरुमच्या खिडकीकडे तोंड करुन सीसीटीव्ही लावले.ही महिला बेडरुममध्ये खासगी कपड्यांवर वावरत असताना या तिघांनी मिळून पाहिले.

हा प्रकार पीडित महिलेच्या निदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी आरोपींना कॅमेरा काढण्यास सांगितले. त्यावर आरोपींनी कॅमेरा काढण्यास नकार दिला. पीडित महिलेवर सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेऊन त्यांचे खाजगी कपड्यांवरील चित्रीकरण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.