जबरदस्तीने मोबाईल हॅन्डसेट चोरणारा आरोपी जेरबंद ; दरोडा व वाहनचोरी पथक-१ ची कामगिरी

पुणे : जबरदस्तीने मोबाईल हॅन्डसेट चोरणा-या आरोपीस गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथक-१ ने जेरबंद केले आहे.अलिअब्बास शौकत इराणी (वय- २२ , रा. महात्मा गांधी वसाहत, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी फिर्यादी ही त्याची मोटार सायकल कावासकी निंजा यावरुन पुणे मुंबई हायवे रोड लगत, नरवीर तानाजी वाडी, वाकडेवाडी,खडकी, पुणे या रोडने जात असताना  त्यांची मोटार सायकल ही सर्व्हिस रोडलगत पार्क करुन सुलभ शौचालयाकरीता गेले असता ते शौचालय करुन परत बाहेर आले असता त्यांच्या पाठीमागुन एक अनोळखी व्यक्ती चालत येवुन त्यांना धडकला.

फिर्यादीनी धडकलेल्या व्यक्तीकडे वळुन पाहिले असता त्या व्यक्तीने काही एक न बोलता फिर्यादी यांच्या हातात असलेला मोबाईल हॅन्डसेट जबरदस्तीने हिसका मारुन चोरी करुन ओढुन मुंबई हायवे रोडने पळुन गेल्याने व ते घाबरलेले असल्याने फिर्यादी यांनी १ ऑक्टोंबर रोजी या बद्दल फिर्याद दिली. त्यानुसार खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर घडलेल्या घटनेचा तपास पुणे गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपी हा शिवास स्नॅक्स, हॉटेल प्राईड शेजारील गल्लीमध्ये, शिवाजीनगर, पुणे येथे थांबलेला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक मोबाईल हॅन्डसेट मिळुन आल्याने त्याचेकडे मोबाईलबाबत अधिक चौकशी करता त्याने सदरचा मोबाईल हा वाकडेवाडी, पुणे येथील सुलभ शौचालयाकरीता थांबलेल्या एका व्यक्तीकडून जबरदस्तीने चोरला असल्याचे सांगितल्याने त्यास आहे त्या परिस्थितीत ताब्यात घेवुन पुढील चौकशीकामी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर चे कार्यालयात आणुन दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्याचा दाखल गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) (अति.कार्य) भाग्यश्री नवटक्के, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, (गुन्हे शाखा- २), (अति.कार्य. गुन्हे- १) यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहा पोलीस फौजदार शाहिद शेख, पोलीस हवालदार निलेश शिवतरे, पोलीस नाईक मॅगी जाधव, धनंजय ताजणे, गणेश ढगे, व पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, ऋषिकेश कोळप दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.