‘दिरहम’ चलनाच्या नोटा स्वस्तात बदलून देण्याच्या नावाखाली फसवणूक; चौघांना अटक
पुणे : युनायटेड अरब इमिरेटस या देशाचे ‘दिरहम‘ चलनाच्या नोटा स्वस्तात देण्याच्या बदल्यात लोकांची फसवणूक करणार्या टोळीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
मोहमद उबईदुल्ला मुदसेर शेख (वय ३०), मोहम्मद कामरान खान (वय २८), रिदोई रहीम खान (वय २३) आणि सयदुल (सर्व रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी कोंढव्यात राहणार्या एका ४० वर्षाच्या तरुणाने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली होती. हा प्रकार बिबवेवाडीतील अप्पर बस डेपोच्या बाजूला ८ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजता घडला होता.
आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांना भारतीय चलनाचे नोटा बदलून ‘युनायटेड अरब अमिरेटस’ या देशाचे ‘दिरहम’ या नोटा देण्याचा बहाणा केला. त्यांना पेसे घेऊन अप्पर बस डेपोचे बाजूला बोलावले. त्यांना रिन साबणाना इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र गुंडाळून एक हात रुमालाने बांधलेला गठ्ठा असलेली लाल रंगाची नायलॉनची पिशवी दिली. फिर्यादी यांनी ही पिशवी उघडून पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या हातातून ६० हजार रुपये असलेली प्लॅस्टिकची पिशवी घेऊन जबरदस्तीने हिसकावून त्यांना हाताने धक्का देऊन जमिनीवर पाडून पळून गेले होते.या टोळीने शहरात अनेकांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे.बिबवेवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करीत आहेत
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!