परळी वैजनाथ येथील खुनाच्या गुन्हयातील ३ वर्षापासून फरार आरोपीस अटक, गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी

पुणे : परळी वैजनाथ येथील खुनाच्या गुन्हयातील ३ वर्षापासून फरार आरोपीस गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलीसांनी अटक केली आहे.सुदिप उर्फ पापा रावसाहेब सोनवणे (वय २४, रा. केशवदर्शन सोसायटी, यश हॉस्पीटलच्या मागे, माळवाडी, हडपसर, पुणे, मूळ रा. सिध्दार्थनगर, परळी वैजनाथ, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्हातील परळी वैजनाथ येथील खूनाच्या गुन्हयातील फरार आरोपी सुदीप उर्फ पापा सोनवणे हा खराडी बायपास चौक, नगर रोड, पुणे येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुदीप उर्फ पापा सोनवणे ताब्यात घेतले.

गुन्हयाच्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्यांच्या इतर साथीदारांसह परळी वैजनाथ येथे एका व्यक्तीचा मे २०१८ मध्ये खुन केल्याचे कबूल केले. सदरबाबत संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी हा गेल्या ३ वर्षापासून नमूद गुन्हयामध्ये फरार असून तो वारंवार राहण्याची ठिकाणे बदलून पोलीसांना गुंगारा देत होता. नमूद आरोपीस पूढील कारवाई कामी संभाजीनगर पोलीस स्टेशन, जि. बीड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अति पदभार अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्रीमती भाग्यश्री नवटके, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २, लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट, ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, पोउनि सुधीर टेंगले, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, नितीन धाडगे, शेखर काटे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.