पुणे – घरफोडीच्या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक
पुणे : घरफोडी करणाऱ्या चार आरोपींना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने अटक केले आहे.धमेंद्र गडवी (रा. खराडी, मुळ गुजरात), निलेश कनुभाई गडवी (वय 50), कुलदीप सादुभा गडवी (वय 41) आणि शक्तीसिंग घनश्यामसिंग गोयल (वय 47 ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना हडपसरमध्ये घरफोडी करून फरार झालेला आरोपी रुपाली हॉटेल समोर, फर्ग्युसन रोड या ठिकाणी उभा असल्याची माहिती दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील पोलिसाना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून धमेंद्र गडवी याला ताब्यात घेतले.
आरोपीस पुढील चौकशीसाठी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर च्या कार्यालयात आणुन दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या आणखी ३ साथीदारसह मिळुन केलेला असल्याचे सांगितले व त्या ३ आरोपी बाबत चौकशी करता त्याने सांगितले की, वरील गुन्ह्यातील संबंधित आरोपी हे शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेरील बाजुस गेट नं १ येथे आले असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बाकी तिघांना ताब्यात घेतले. संबंधित आरोपींनी घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीच गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कारवाईकरीता हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटक्के, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, (गुन्हे शाखा- २) यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल
शेवाळे, सहा पोलीस फौजदार शाहिद शेख, पोलीस हवालदार निलेश शिवतरे, पोलीस नाईक धनंजय ताजणे, गणेश ढगे, मॅगी जाधव, व पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे, सुमित ताकपेरे व ऋषिकेश कोळप दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!