मौजमजेसाठी वाहने चोरणा-या आरोपींना अटक, गुन्हे शाखा युनिट ५ ची कामगिरी

पुणे : मौजमजेसाठी वाहने चोरणा-या आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत ७ वाहनचोरीचे व १ जबरी चोरीचा असे ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

वैभव नागनाथ बिनवडे उन (वय १९ रा.उंद्रे चाळ, मिलिंद तुपे चौक,माळवाडी,हडपसर पुणे), किरण भारत गायकवाड (वय १९ रा. मुळगाव केडगाव, भैरवनाथ मंदिराजवळ,ता.करमाळा जि. सोलापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव बिनवडे व त्यांचा साथीदार यांनी एक रिक्षा चोरलेली असुन ते मंतरवाडी, उंड्री भागात रिक्षा घेवुन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट  ५ च्या पथकाला मिळाली.  त्यानुसार पोलिसांनी मंतरवाडी भागात सापळा रचला असता वैभव बिनवडे, किरण गायकवाड व दोन विधी संर्घर्षित बालक हे चोरीचे रिक्षामध्ये फिरताना मिळुन आले. सदर रिक्षा बाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असल्याचे पोलीसांना आढळुन आले.

आरोपींना दाखल गुन्हयात अटक करुन त्याचाकडे कसोशीने तपास करता त्यांनी मौजमजेसाठी ७ वाहने त्यामध्ये ६ मोटर सायकल व १ तीन आसणी रिक्षा व एक जबरी चोरी करुन मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी कडुन ७ वाहनचोरीचे व १ जबरी चोरीचा असे ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.