यु-टयुब वरील व्हिडीओ पाहुन एटीएम फोडणा-या दोघांना अटक, ९ गुन्हे उघडकीस
पिंपरी चिंचवड : यु-टयुब वरील व्हिडीओ पाहुन एटीएम फोडणा-या दोन आरोपींना वाकडं पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
महादेव प्रकाश तिर्थे (वय १९ रा. चिंतामणी मंदीराचे बाजुला आनंद शेटे यांचे घरी भाडयाने वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे मुळ रा. विर हनमंतवाडी ता.जि.लातुर ), निशांत ज्ञानेश्वर गुळुजकर (वय २४ रा. सर्वे नं.१२७ ग्रिनपार्क, चिंतामणी चौक, चिंचवड पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएम फोडी सारखे गुन्हयांना गांर्भीयाने घेत सदर गुन्हयांना प्रतिबंध व गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी एटीएम फोडी सारखे गुन्हयांना गांर्भीयाने घेत सदर गुन्हयांना प्रतिबंध व गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले आहे. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे अधिनस्थ असलेले तपास पथकातील सपोनि संतोष पाटी लव तपास पथकातील अंमलदार यांना सदरबाबत सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने वाकड पोलीस तपास पथकातील पोलिस वाकड हद्दीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, एटीएम फोडणारे दोन गुन्हेगार होंडा शाईन मोटार सायकलवरुन आदित्य बिर्ला हॉस्पीटल थेरगाव पुणे येथे येणार आहेत.त्यानुसार पोलिसांनी आदित्य बिर्ला हॉस्पीटल येथे सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांनी वाकड, तळेगाव दाभाडे, चिखली, निगडी, चिंचवड, चाकण भागामध्ये मागील सहा महीन्यात एटीएम फोडल्याची कबुली दिली. सदरच्या आरोपींना अटक करुन त्यांच्याकडुन ९ गुन्हे उघडकीस आणले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!