गांजा विक्री आलेल्या 27 वर्षीय तरुणाला अटक ; दोन किलो गांजा जप्त

पिंपरी चिंचवड : गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या 27 वर्षीय तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे . त्याच्याकडून दोन किलो 60 ग्रॅम गांजासह सहा लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला आहे. ही कारवाई भारतनगर, भोसरी येथे शनिवारी (दि. 2) दुपारी करण्यात आली.

सुजित सुभाष खुळे (वय 27, रा. मु. पो. फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस नाईक मयुर मधूकर वाडकर यांनी शनिवारी (दि. 2)  दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खुळे हा गांजा विक्रीसाठी आळंदी रोड येथील भारतनगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी  सापळा लावला. त्यावेळी कार मधून आलेल्या आरोपी खुळे याला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन किलो 60 ग्रॅम वजनाचा 51 हजार 500 रुपयांचा गांजा आढळला. पोलिसांनी गांजासह सहा लाखांची कार व इतर साहित्य असा एकूण सहा लाख 51 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.