पोलीस अधिकाऱ्याकडून 25 वर्षीय तरुणींवर बलात्कार ; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे :  पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात, बलात्काराच्या घटनांनीही पुणे शहर हादरुन गेले होते. आता, पुण्यातील कोथरूड परिसरात एका पोलीस अधिकाऱ्यानेच लग्नाचं आमिष दाखवून 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं आपलं पहिलं लग्न लपवून ठेवून फिर्यादीची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस अधिकाऱ्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रवीण नागेश जर्दे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून तो पुण्यातील कोथरूड परिसरातील रहिवासी आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

संशयित आरोपी प्रवीण जर्दे याची 2018 साली पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. मे 2020 मध्ये एका गुन्ह्याचा तपास करत असताना, एका आरोपीच्या बहिणीसोबत जर्दे याची ओळख झाली होती. आरोपीनं पहिलं लग्न झाल्याचं लपवून ठेवत आरोपीने तिच्याशी जवळीस वाढवली. तसेच, लग्नाचे आमिष दाखवून  पीडिताला पुणे आणि परिसरातील विविध ठिकाणी नेत तिच्यार वारंवार बलात्कार केला. पीडिताने लग्नाची मागणी केल्यावर तिला टाळाटाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.  याप्रकरणी कोथरुड पोलीस अधिक तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.