नोकरी गेल्याने मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतले, नंतर स्वतःवर वार करत तरुणाने संपवले जीवन

पुणे : नोकरी गेल्याच्या नैराश्येतून परराज्यातील एका तरुणाने पोटात चाकू खुपसून घेत आत्महत्या केली.त्याआधी हा तरुणाने मंदिरात साईबाबांना हार घातला आणि त्यांच्यासमोर नतमस्तक झाला होता. ही धक्कादायक घटना पुण्यातील साने गुरुजी वसाहत येथे गुरुवारी रात्री घडली असून अति रक्तस्राव झाल्याने या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.राजेंद्र रमेश महाजन (वय-22 रा. पुणे, मुळ रा. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मध्य प्रदेशातून काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये आला होता.  बीएससीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. परंतु, काही महिन्यांपूर्वी तो पुण्यात नोकरीनिमित्त आला होता. तो रांजणगाव परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी देखील करत होता. त्याचे आई-वडील बुऱ्हाणपूरमध्येच राहत होते. तोच फक्त पुण्यात आला होता. त्याच्या घरी शेती असून, त्याचे कुटुंबीय शेती करत होते.

दरम्यान ही घटना घडली त्या दिवशी राजेंद्रने दिवसभर आई-वडील मित्र मैत्रिणींना फोन करून त्यांच्याशी गप्पा मारल्या. तर, आई-वडिलांना मी परत घरी येणार आहे. येथील नोकरी सोडली असल्याचे सांगितले. आई-वडिलांनी देखील त्याला होकार देत परत ये आणि शेती कर. तसेच, त्यातून शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता. त्याने देखील हे मान्य करत होकार देऊन फोन ठेवला. मुलगा येणार असल्याने कुटुंबीय देखील आनंदी होते.
परंतु,राजेंद्र हा गुरुवारी रात्री 8 ते 9 दरम्यान दत्तवाडी परिसरातील साने गुरुजी वसाहत येथील दत्तमंदिरात गेला. त्याठिकाणी दत्ताचे दर्शन घेऊन तो मंदिरा बाहेर आला.

मंदिराबाहेर आल्यानंतर त्याने सोबत आणलेल्या चाकून स्वत:ला पोटात खुपसून घेतले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.
एक तरुण मंदिरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याला तात्काळ रुग्णालयात भरती केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दत्तवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजेंद्र जवळ असलेल्या मोबाईलवरुन दत्तवाडी पोलिसांनी घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. मुलाची वाट पाहत असणाऱ्या नातेवाईकांची घटनेची माहिती मिळताच धक्का बसला.
त्याचे नातेवाईक मध्य प्रदेशातून  पुण्याकडे येण्यासाठी रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.