मित्राचा खून केल्याच्या रागातून गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; दोघा सख्ख्या भावांसह तिघांना अटक

पुणे : मित्राचा खून केल्याच्या रागातून गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; दोघा सख्ख्या भावांसह तिघांना अटक पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चोवीस तासात अटक केली आहे.

सनी सुरेश बारंगळे (वय 31, रा. भोर), अमीर महम्मद मनेर (वय 26) समीर महम्मद मनेर (वय 26 रा. नवीअळी, भोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आनंदा गणेश सागऴे (वय. 23, मूळ गाव – नागोबा आळी, भोर. सध्या रा, बालाजीनगर पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत आनंद सांगळे याने 2017 साली आरोपी सनी बारंगळे, अमीर मनेर, समीर मनेर यांच्या मित्राचा खून केला होता. त्यामुळे त्यांच्यात वादावादी होती.गेल्या वर्षापासून तो जामिनावर कारागृहाबाहेर असून तो बालाजीनगर येथे राहण्यास होता. शनिवारी रात्री तो भोरला मित्रांसोबत पार्टीला जाणार असल्याचे त्याने आईला सांगितले होते. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मयत आनंद सागळे हा नागोबा आळीतील आकाश दत्तात्रेय मोरे याच्यासमवेत दुचाकीवरून एसटीस्टँडकडे निघाले होते. त्यावेळी सम्राट चौकात विनापरवानगी सुरु असलेल्या हातगाडीवर सनी बारंगळे, अमिर मणेर, समीर मणेर, आणि सिद्धांत बोरकर हे चौघेजण मद्यपान करीत होते. त्यापैकी समीर मणेर याने आनंद सागळे याच्या गळ्यात हात घालून तू लय मोठा झालाय का असे बोलला. त्यावेळी त्यांच्या धक्याने तिथे उभी असलेली एक दुचाकी खाली पडली.

त्यामुळे त्यांच्यामध्ये बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली. त्यानंतर सनी बारंगळे व सिद्धांत बोरकर यांनी आनंदचे हात पकडले आणि अमिर मणेर, याने दगड व बाटलीच्या साहय्याने आनंदच्या तोंडावर वार व  डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून खून केला.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. त्यावेळी तिन्ही प्रमुख फरार आरोपी कापूरहोळ पुलाखाली थांबले असून ते बंगळुरूला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस नाईक अमोल शेडगे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना शिताफीने ताब्यात घेतले.चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, पुनम गुंड यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.