‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’, तडीपार आरोपींकडून पोलिसांना जिवे मारण्याची धमकी

पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपीने कोयता दाखवत ‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’ असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण करत पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार (वय 28, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक शहाजी धायगुडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार फिर्यादी आणि त्यांचे सहकारी पोलीस आरोपीला पकडण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने कोयता जवळ बाळगून पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या अंगावर धाऊन गेला.

त्यानंतर हातात कोयता घेऊन ‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’ अशी धमकी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर ‘आज दिवस तुमचा आहे, उद्या काय करणार, तुम्हांला मीच पुरा पडणार’ असे म्हणत पोलिसांना शिवीगाळ करुन धमकी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.