तब्बल सहा तासानंतर व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्रम पुन्हा सुरु ; कंपनीनं मागितली माफी

 

मुंबई : फेसबुकची मालकी असलेले फेसबुक, व्हॉटस् अॅप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर एकाच वेळी डाऊन झाले. सोमवारी रात्री 9 नंतर अचानक झालेल्या या प्रकारामुळे युजर्सही गोंधळून गेले.  आता  चारीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तब्बल सहा तासानंतर पुन्हा सुरळीत झाले आहेत.

सोमवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक अडचण येऊ लागली. नेमकी काय अडचण आहे हे स्पष्ट होत नसल्याने सर्वच नेटकरी आणि सोशल मीडिया प्रेमी एकमेकांशी मोबाईलवर संपर्क करून विचारणा करीत होते.

एकाचवेळी चारीही सोशलमीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झाले असल्याने जगभरात प्रचंड गोंधळ उडाला होता. त्यातच सर्व्हर डाऊन होण्यामागे नेमके कारण काय आहे,  त्याबाबत अद्याप कुठलंही कारण समोर आलं नाही. काही लोकांनी यामागे सायबर हल्ला असल्याची शक्यता वर्तवली आहे. भारतासह जगभरात सहा तासाहून अधिक काळ ही सेवा बंद होती. आता तात्पुरत्या स्वरुपात पुन्हा सेवा सुरू झाल्याची माहिती  न्यूज एजेंन्सी रॉयटर्सनं दिली आहे.

भारतीय वेळेनुसार, मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र Facebook, Instagram, आणि WhatsApp सर्वर डाऊन का झाला हे अजून स्पष्ट झालं नाही. काही जणांच्या मते या सर्वरचं डीएनएस खराब झाल्याने सेवा बंद झाल्याचं बोललं जात आहे. DNS हा इंटरनेटचा कणा मानला जातो. तुम्ही जेव्हा तुमच्या मोबाईलवर अथवा कॉम्प्युटरवर वेबसाईट ओपन करता तेव्हा DNS तुमच्या ब्राऊजरला कुठल्याही वेबसाईटचा आयपी काय आहे हे सांगतो. प्रत्येक वेबसाईटचा एक आयपी असतो. ट्विटर, फेसबुक प्रकरणात DNS तुमच्या ब्राऊजरला ट्विटर, फेसबुकचा आयपी काय आहे ते सांगतो. अशावेळी फेसबुक, ट्विटरचा रेकॉर्ड असलेला DNS डेटाबेसमधून काढून टाकला जातो. तेव्हा तुम्ही फेसबुक, ट्विटर एक्सेस करू शकत नाही.

 

सर्व्हर अचानक बंद झाल्याने होता गोंधळ

जगात लोकप्रिय असणारे मेसेंजिग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅपचे सर्व्हर अचानकपणे बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या होत्या. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स बंद पडले होते. साधारणतः दीड ते दोन तास हा प्रकार सुरू होता. व्हॉट्सअ‌ॅप नवे मेसेज सेंड आणि रिसिव्ह होत नव्हते. त्याचबरोबर व्हॉट्सअ‌ॅप स्टेटसही अपलोड होण्यास अडचणी येत होत्या. फेसबुक, इन्स्टाग्राम रिफ्रेश होत नसल्याने नवीन अपडेट कळत नव्हते.

व्हॉट्स ऍपच्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, हळूहळू सेवा पुर्ववत होत असून आम्ही पूर्ण सतर्कतेने या दिशेला जात आहोत. इतका वेळ युजर्सला  व्हॉट्स ऍप वापरता आलं नाही त्याबद्दल क्षमा मागतो. सर्वर डाऊन झाल्याबद्दल जी काही कारणं समोर येतील ते तुमच्यापर्यंत पोहचवली जातील. काही लोकांकडून आम्हाला ही सेवा काम करत नसल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर आम्ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत असं सांगण्यात आले आहे.

ट्विटरवर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्ड

व्हॉट्सअ‌ॅप अचानकपणे बंद पडल्यामुळे ट्विटरवर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा यामागचं नेमकं कारण समजू शकलेलं नव्हते. व्हॉट्सअ‌ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक यांचे सर्व्हर डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर अनेकांनी ट्विट करत सर्वांना तशाच अडचणी येत आहेत का? अशी शंका विचारली. अवघ्या काही क्षणात ट्विटरवर या संदर्भात इतके ट्विट आले की हा मुद्दा ट्विटरवर ट्रेंड करायला लागला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.