पंतप्रधान मोदी यांच्या डिजीटल इंडिया संकल्पनेचा सर्व सामान्यांना फायदा – अमित गोरखे

पिंपरी गावात गणेश वाळुजकर यांनी आयुष्यमान भारत योजनेचे केले कार्ड वाटप

पिंपरी चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडिया संकल्पनेतून सर्व सामान्य नागरिकांना थेट लाभ मिळेल अशा शेकडो योजना कार्यान्वित केल्या आहेत. यामध्ये ‘आयुष्यमान भारत योजना’ हि नागरिकांना संकटाच्या काळात वैद्यकीय उपचारावेळी थेट पाच लाख रुपयांची कॅशलेस सुविधा देणारी महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेचा लाभ सर्व सामान्यांना मिळवून देण्यासाठी भाजपाचे अनेक कार्यकर्ते काम करीत आहेत. यामध्ये भाजपाच्या पक्ष संघटनेत सक्रियपणे काम करणारा नम्र स्वभावाचा गणेश वाळुजकर एक सुस्वभावी कार्यकर्ता आहे. याचा इतर कार्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केले.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त भाजपाचे शहर पदाधिकारी गणेश वाळूजकर आणि तुळजा भवानी बचत गटाच्या अध्यक्षा अनिता वाळूजकर यांनी ‘सेवा सर्मपण सप्ताह’ अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमित गोरखे बोलत होते.

शनिवारी (दि. 2 ऑक्टोबर) पिपंरी गावात पावर हाऊस चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष तात्या जवळकर, भाजपा शहर सरचिटणीस देवदत्त लांडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमल मलकानी, प्रा. गणेश ढाकणे, आयोजक गणेश वाळुजकर, अनिता वाळुजकर तसेच शारदा मुंढे, अशोक पंडीत, नेहूल कुदळे, आनंदा कुदळे, सलीम शेख, राजू लोखंडे, पुंडलीक सैंदाणे, गणेश शिंदे, गणेश लंगोटे, निती अमृतकर, जयेश चौधरी, संतोष शिंदे, मुकेश दळवी, गणेश वाणी, नामदेव वाघेरे, गिरीष गव्हाणे, विठ्ठल वाघेरे, रविंद्र फुलपगारे, संदिप महाले, जितेंद्र चित्ते, किशोर पवार आदी उपस्थित होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.