पुण्यात ड्रायव्हरच गाडीतील 97 लाख रुपये घेऊन पळाला

पुणे : गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्यानेच गाडीतील 97 लाख रुपये घेऊन पळ काढल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे.  ही घटना सोमवारी (दि.4) कल्याणीनगर परिसरात घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय महादेव हुलगुंडे (कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत 50 वर्षीय व्यवसायिकाने फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी यांचा ड्रायफ्रुटस व्यवसाय असून ते कोंढवा येथे राहण्यास आहेत. हुलगुंडे हा मागील आठ महिन्यांपासून त्यांच्याकडे चालक म्हणून कामाला होता. सोमवारी ते रक्कम घेऊन कोंढवा येथून चारचाकीतून येरवडा परिसरात येत होते. या दरम्यान, त्यांना लघुशंका आल्याने त्यांनी कल्याणीनगर परिसरात चालकाला गाडी थांबविण्याचे सांगून ते खाली उतरले. यावेळी पैसे असलेली बॅग गाडीमध्येच होती. याचा गैरफायदा घेत चालकाने गाडी तशीच पुढे काही अंतरावर नेऊन उभी केली. यानंतर काही वेळात गाडीतील पैशाची बॅग घेऊन चालक पसार झाला. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.