थेरगावात कारमध्ये आढळला मृतदेह ; परिसरात खळबळ
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील थेरगाव येथील पदमजी पेपर मिल समोर गुरुवारी (दि. 7 ) रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एका कारमध्ये 44 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महेश लक्ष्मण पायगुडे (वय 44, रा. गोखले वृंदावन, राघवेंद्र मठाजवळ, थेरगाव) असे मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास थेरगाव येथील पदमजी पेपर मिल समोर एका कारमध्ये महेश पायगुडे यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत महेश मागील काही दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा फोनही लागत नव्हता. त्यांच्या घरच्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना महेश बेपत्ता असल्याची माहिती दिली नाही. मागील दोन ते तीन दिवसांपासून महेशचा मृतदेह गाडीमध्ये असल्याचे समोर आले आहे.
महेश यांची आई मंदाकिनी लक्ष्मण पायगुडे (वय 65) यांनी पोलिसांना माहिती दिली की, महेश यांना दारूचे व्यसन होते. त्यांची एक मुलगी मागील चार महिन्यांपूर्वी एका दुर्धर आजाराने मयत झाली. त्यांची पत्नी गावी आहे. महेश यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!