धक्कादायक! एसटी चालकाची बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या

लातूर :  लातूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका एसटी कर्मचाऱ्याने थेट बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या  केली आहे. पगार वेळेवर मिळत नसल्याने या तणावातून ही आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होतो आहे.

संजय रामराव केसगिरे असं मृत एसटी चालकाचे नाव आहे.उदगीर बस स्थानकात एका एसटी चालकाने ५ ऑक्टोबर रोजी एम एच १४ बीटी २१६० या क्रमांकाच्या बसमधे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, मृत संजय केसगिरे यांनी गळफास लावून घेतल्याचे पाहताच बस स्थानकातील इतर कर्मचाऱ्यांनी केसगिरे यांना तात्काळ उदगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरानी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे. दरम्यान, वेळेवर वेतन मिळत नसल्याने केसगिरे आर्थिक विवंचनेत होते.

या तणावातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संजय केसगिरे यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी अधिक तपास उदगीर पोलीस करीत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.