खेडशिवापुर टोलनाक्यावर 32 लाखाचे चरस जप्त ; राजगड पोलिसांची कामगिरी

खेड-शिवापूर : मुंबईहून गोव्याला निघालेल्या लक्झरी बसमधून राजगड उन पोलिसांनी पुणे- सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर शुक्रवारी पहाटे सुमारे बत्तीस लाख रुपये किमतीचा सहा किलो चरस कारवाई करत जप्त केला आहे.

मुंबई ते गोवा या मार्गावर धावणाऱ्या डॉल्फिन ट्रॅव्हल्स मधून एक व्यक्ती चरस घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून  मुंबई वरून गोव्याला चाललेल्या खाजगी बसला पहाटे पाच च्या सुमारास खेडशिवापुर टोल नाक्यावर थांबवून तपासणी केली असता बस मधील  एका व्यक्तीकडे चरस असलेले पुडे आढळून आले.

तपास पथकाने त्या इसमास ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला  जप्त केलेल्या चरस चे एकूण वजन 6 किलो असून त्याचे भारतीय बाजारातील मूल्य हे अंदाजे 32 लाख रुपये असून आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे साडेतीन कोटी रुपये एवढी आहे.

ही कारवाई  पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख ,बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते , भोर  पोलीस उपविभागीय अधिकारी  धनंजय पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदुम,पोलीस हवालदार सोमनाथ जाधव, संतोष तोडकर ,अजित माने ,भगीरथ घुले ,नाना मदने  प्रमिला निकम यां पथकाने केली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.