रस्त्याने पायी जाणार्या व्यक्तीस कोयत्याचा धाक दाखवुन लोखंडी पाईपने मारहान करणाऱ्या आरोपींना अटक
पिंपरी चिंचवड : रस्त्याने पायी जाणार्या व्यक्तीस कोयत्याचा धाक दाखवुन लोखंडी पाईपने मारहान करणारे व मोबाईल फोन काढुन घेणाऱ्या आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ लोखंडी कोयता, १ लोखंडी पाईप, फिर्यादीकडुन जबरदस्तीने काढुन घेतलेला मोबाईल फोन व इतर ०३ मोबाईल फोन असे हत्यारे व साहीत्य जप्त केले आहेत.
प्रतिक बाळासाहेब आढाव (वय १९ वर्ष, रा-चक्रपाणी वसाहत भोसरी पुणे), सुरज बळीराम रोकडे (वय १८ वर्ष ०५ महिने, रा-वाकी खुर्द, ता-खेड, जि-पुणे), विठ्ठल नंदीराम मोरे (वय २० वर्ष, रा-नानेकरवाडी, ता-खेड, जि-पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास फिर्यादी सर्वजीतसिंग बंजरंगप्रताप (वय २१ वर्ष हे मौजे खराबवाडी, ता-खेड, जि-पुणे) हे सहारा सिटी ते जंबुकरवस्ती या रोडने पायी चालत जात असताना आरोपी लाल रंगाचे पल्सर मोटार सायकलवरुन आले आणि फिर्यादीस लोखंडी कोयत्याचा धाक दाखवुन व लोखंडी पाईपने मारहान करुन फिर्यादीकडील ९ हजार ५०० रुपये किमतीचा टेक्नोस्पर्क कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढुन घेवुन मोटार सायकलवरुन पळुन गेले.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने पोलिसांनी नाकाबंदी केली व गोपनिय बातमीदार माहिती प्राप्त करुन आरोपी सुरज बळीराम रोकडे व त्याच्या एक अल्पवयीन साथीदार यास ताब्यात घेवुन तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचा मिञ प्रतिक बाळासाहेब आढाव, यांच्या साथीने केल्याचे कबुल केले. त्यानुसार पोलिसांनी प्रतिक बाळासाहेब आढाव यास भोसरी चक्रपाणी वसाहत येथुन ताब्यात घेवुन अटक केली.
अटक आरोपींकडे अधिक तपास केला असता फिर्यादीकडुन जबरदस्तीने काढुन घेतलेला मोबाईल फोन हा विठ्ठल नंदीराम मोरे, यास विक्री केल्याचे सागितले. त्यानुसार पोलिसांनी विठ्ठल नंदीराम मोरे याच्याडुन फिर्यादीचा मोबाईल फोन जप्त केला.
सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ९ ऑक्टोंबर पर्यत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. तसेच त्यांचा अल्पवयीन साथीदारास बाल न्यायालय यांचे समक्ष हजर करण्यात आले आहे. त्याच्याकडून १ लोखंडी कोयता, १ लोखंडी पाईप, फिर्यादीकडुन जबरदस्तीने काढुन घेतलेला मोबाईल फोन व इतर ०३ मोबाईल फोन असे हत्यारे व साहीत्य जप्त केले आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ – मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, महालुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स.पो.निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस हवालदार चंदु गवारी, राजु कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, तानाजी गाडे, शिवाजी लोखंडे, हिरामन सांगडे, शरद खैरे, श्रीधन इचके यांनी पार पाडली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश चिट्टमपल्ले हे करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!