व्हॉट्सॲप द्वारे सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; दहशतवाद विरोधी कक्ष व लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई

लोणावळा : व्हॉट्सॲप द्वारे सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा दहशतवाद विरोधी कक्ष व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक केली असून दोन मुलीची सुटका करण्यात आली आहे. जय उर्फ धनंजय कातवारू राजभर (वय ३७ वर्ष सध्या राहणार नांगरगाव लोणावळा, मूळ राहणार- टिळक नगर चेंबूर मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लोणावळा परिसरामध्ये व्हाँट्सअप च्या माध्यमातून ग्राहकांना फोटो पाठवून मुलींचे दर ठरवून या मुली गाडी मधून लोणावळा परिसरातील ग्राहकांना पुरवल्या जात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. डॉ अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने दहशतवाद विरोधी कक्ष पथक पुणे ग्रामीण व लोणावळा ग्रामीण पोलीस पथकाने बनावट ग्राहका द्वारे जय उर्फ धनंजय यांच्याशी व्हाँट्सअप वर संपर्क केला असता. त्याने व्हाँट्सअप वर वेश्याव्यवसायासाठी मुलींचे फोटो पाठवून दर ठरवल्यानंतर या मुलींना तो मनशक्ती वर्सोली लोणावळा येथे घेऊन येतो असे कळल्यानंतर पोलीस पथकाने मनशक्ती जवळ सापळा रचला. त्यानंतर जय उर्फ धनंजय हा टोयाटो कोरोला गाडीमधून दोन मुली घेऊन तेथे आला खात्री पटल्यानंतर पोलीस पथकाने जय उर्फ धनंजय यास ताब्यात घेतले. गाडीमध्ये असणाऱ्या वेश्या व्यवसायासाठी आणले गेलेल्या दिल्ली येथील दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे. जय उर्फ धनंजय हा लोणावळा येथील एका महिलेसोबत हे काम करतो अशी माहिती मिळाली आहे सदर महिलेचा शोध सुरू आहे. अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे , अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी लोणावळा राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, विश्वास खरात, पोलीस हवालदार ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत व स्थानिक गुन्हे शाखा सुजाता कदम पुनम गुंड तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे युवराज बनसोडे, पुष्पा घुगे, सिद्धेश्वर शिंदे या पथकाने केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.