कोल्ड्रींकमधून गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर बलात्कार, आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

पुणे :मार्केटींग करणाऱ्या एका 25 वर्षाच्या विवाहितेला ग्राहकाला भेटवतो असे सांगून लॉजवर नेले. त्याठिकाणी कोल्ड्रींक मधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना पुण्यातील पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजवर 24 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन ते पाच या दरम्यान घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी उरुळी कांचन येथील 25 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार धनंजय जाधव नामक व्यक्तीवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मार्केटिंगचे काम करते. तिने फेसबुकवर याची जाहिरात केली होती. येथूनच आरोपीने तिचा नंबर घेतला. त्यानंतर तिच्याशी संपर्क साधून मार्केटिंग करत असलेली वस्तू नातेवाईकांना पाहिजे असे सांगितले आणि भेटण्यासाठी बोलावले. दरम्यान पीडित महिला भेटण्यासाठी आली असता त्याने ग्राहकांना भेटवण्याच्या निमित्ताने स्टेशन परिसरातील लॉजवर तिला नेले.

त्याठिकाणी तिला कोल्ड्रींक बॉटलमधून गुंगीचे औषध पाजले.
तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.
तसेच घटनेचा व्हिडिओ आणि फोटो काढले. काही दिवसांनी हे फोटो आणि व्हिडिओ तरुणीला पाठवले. आरोपीने तरुणीला आपल्या सोबत संबंध ठेवण्यास सांगितले. याला नकार दिल्यानंतर आरोपीने तरुणीला शारिरीक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ आणि फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पतीला व्हिडिओ दाखवण्याची धमकी दिली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.