खडकी दौंड येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ; दहशतवाद विरोधी कक्ष व सायबर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांची कारवाई

राजेगाव : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत खडकी येथील लॉजवर दौंड पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून सहा मुलींची सुटका करण्यात आली असल्याची माहिती पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी दिली..

रवीश शेट्टी (वय 35 वर्ष मूळ राहणार उडपी कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, डॉ अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना बातमी दाराकडून खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे पुणे सोलापूर हायवे लगत असलेल्या सूर्या लॉजवर वेश्याव्यवसाय चालू आहे अशी माहिती मिळाली होती. या माहितीवरून सदर ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी सायबर पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व दहशतवाद विरोधी कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांना यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या पोलिस पथकाने पोलीस निरीक्षक नारायण पवार यवत पोलीस स्टेशन यांना सोबत घेऊन खडकी येथे जाऊन सूर्या लॉजवर छापा टाकून लॉज वर वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रविश शेट्टी याला ताब्यात घेऊन या लॉजवर वेश्याव्यवसायात अडकलेल्या एकूण सहा मुलींची सुटका करण्यात आली आहे. सदर कारवाई मध्ये रवीश शेट्टी याचा सहकारी सोनू , सुनील जामगे व लॉज मालक बब्बी शेठ यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याबाबत पुढील अधिक तपास दौंड पोलीस करत आहेत.

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार यवत पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सायबर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, दहशतवाद विरोधी कक्षाचे किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत व सायबर पोलिस स्टेशनचे अतुल ढेरे, स्नेहल कामठे पुनम थोरात यवत पोलीस स्टेशनचे अजित काळे, विजय यादव या पथकाने केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.