अल्पवयीन मुलगी खरेदीसाठी आली असता दुकानदाराकडून तिचा विनयभंग; पोक्‍सोचा गुन्हा दाखल

मंचर : अल्पवयीन मुलगी खरेदीसाठी आली असता त्याने तिचा हात धरला आणि तिला मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची खेड तालुक्यातील शिंदेवाडी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका विरोधात पोक्‍सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिष उर्फ बट्ट्या श्रीधर काळे असे कारागृहात रवानगी करण्यात आलेल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीधर काळेच्या दुकानात पिडीत अल्पवयीन मुलगी खरेदीसाठी आली असता त्याने तिचा हात धरला आणि पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याबाबत पीडितेच्या वडिलांनी काळेला जाब विचारला असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.