पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर ग्रेड सेपरेटरमध्ये उडी मारून एकाची आत्महत्या

पिंपरी चिंचवड :एका ५० वर्षीय व्यक्तीने पिंपरी चिंचवड महापालिका भवनाच्या समोर पुणे-मुंबई महामार्गावर पुलावरून उडी मारून  आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी (दि. ११) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

अग्निशमन विभागाचे अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीकडून चिंचवडच्या दिशेने जाणाऱ्या ग्रेडसेपरेटरवरील पुलावरून एका ५० वर्षीय व्यक्तीने ग्रेडसेपरेटरमध्ये उडी घेतली. त्यामुळे अचानक वाहतूक खोळंबली. तसेच रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांची गर्दी झाली. पोलीस कर्मचारी आबासाहेब बंडगर यांनी याबाबत अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानुसार पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशामक केंद्राचे जवान व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान तोपर्यंत त्या व्यक्तीने पुणे-मुंबई महामार्गावर महापालिका भवनासमोरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.त्याने उडी मारत असताना कोणीही प्रत्यक्षदर्शी नसल्याचे समजते. तसेच उडी मारणाऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकलेले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.