प्रेम संबंधात अडथळा ठरणा-या भावाचा खून, 2 वर्षापुर्वीच्या मर्डरचा असा झाला पर्दाफाश, पुण्याच्या मुळशी तालुक्यातील प्रकरण

पुणे : प्रेम संबंधासाठी अडथळा ठरणा-या भावाचा २ वर्षापूर्वी लोखंडी रॉडने मारून खून केला. त्यानंतर मयत तरुणाचा मृतदेह शेतातील झाडाझुडूपात खड्डा खणून पुरून पुरावा नष्ट केला. ज्या मुुलीसाठी आरोपीने भावाचा खून केला, तिचे दुसर्‍या मुलाबरोबर लग्न झाले. पण तरीही त्याच्या डोक्यातून प्रेमाचे भूत उतरले नाही. त्याने या तरुणीबरोबरचे अश्लिल फोटो तिला पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. तेव्हा तिने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर दोन वर्षापूवी झालेल्या खूनाचा गुन्हा उघडकीस आला. हा  प्रकार नोव्हेंबर 2019 मध्ये मुळशी तालुक्यातील जातेडे गावात घडला.

गजानन इडोळे (वय 23) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. योगेश विलास इडोळे, ओम मुटकुळे या दोघांच्या विरोधात 10 ऑक्टोबर 2021 रोजी पौड पोलीस ठाण्यात खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम एस गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश याचे एका तरुणीसोबत  प्रेमसंबंध होते. त्या दोघांना लग्न करायचे होते. मयत गजानन याला हे प्रेमप्रकरण माहित होते. त्यांच्या प्रेम संबंधामध्ये मयत गजानन अडथळा ठरत होता. गजानन हा आरोपी योगेश याला त्रास देत असे. याच कारणावरून आरोपी योगेश आणि ओम या दोघांनी मिळून स्प्रिंकलरच्या रॉडने गजाननच्या डोक्यात घाव घालून त्याचा खून केला. त्यानंतर गजाननचा मृतदेह मुळशी तालुक्यातील जातेडे गावातील सतीश कदम यांच्या शेतावर झाडाझुडूपात खड्डा खणून त्यात पुरुन टाकून पुरावा नष्ट केला.

दरम्यान, या तरुणीचे आरोपी योगेश यांच्या सोबत लग्न न होता परतूर येथील मुलाबरोबर लग्न झाले. ती सासरी गेली. तेव्हा आता योगेश याने तिला तेव्हाचे काढलेले अश्लिल फोटो व्हायरल करेल अशी धमकी देऊ लागला. या तरुणीने ही बाब आपल्या आईला कळविली. त्यानंतर त्यांनी परतूर पोलिसांकडे धाव घेतली.

परतूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन योगेश इंडोळे याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात याच प्रेमसंबंधातून त्याने आपल्या भावाचा खून केला असल्याची कबुली दिली. त्यामुळे सुमारे दोन वर्षांनी हे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पौड पोलीस तपास करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.