पुणे हादरले ! एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा कोयत्याने चिरला गळा; शीर धडापासून झाले वेगळे

पुणे : प्रेम अतिशय निखळ आणि पवित्र अशी भावना आहे. पण कधीकधी याच प्रेमाचे प्रेमाचे रुपांतर सुडामध्ये होते. सध्या असाच एक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यात एकतर्फी प्रेमातून इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या कबडीपट्टू मुलीचा नात्यातील तरुणाने धारदार कोयत्याने मानेवर वार करून खून केल्याची घटना बिबवेवाडी मधील यश लॉन्स परिसरामध्ये बुधवारी संध्याकाळी घडली.या घटनेत अक्षरशः मुलीचे शीर अक्षरशः धडापासून वेगळे झाले होते.अंगावर धरकाप उडविणाऱ्या या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेजण ताब्यात घेण्यात आले आहेत.

क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14, रा, अप्पर, बिबवेवाडी) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे.  ऋषिकेश उर्फ शुभम बाजीराव भागवत (वय 21, रा. लोहम, खंडाळा, सातारा), त्याचे दोन साथीदार व अन्य दोघे अशा पाच जणांविरुद्ध अशा तिघांविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत क्षितिजा इयत्ता 8 वी मध्ये शिकत होती. ती कबड्डी खेळाडू होती. ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करीत होती.यावेळी आजूबाजूला काही छोटी मुलं तसेच इतन नागरिक व्यायाम करत होते.दरम्यान, मुलगी कबड्डी खेळत असताना आरोपी शुभम आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी आले. त्याने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी त्याने तिच्या मैत्रिणींना लांब पळवून लावले.

त्यानंतर त्याने त्याच्याकडील कोयत्याने क्षितीजाच्या गळ्यावर वार केले. त्याचबरोबर त्याच्या मित्रांनी देखील त्यांच्याकडील शस्त्रांनी वार केले.या हल्ल्यामध्ये क्षितीजाचे शीर धडापासून वेगळे झाले होते.अत्यंत भीषण पद्धतीने आरोपीने तिचा खून केला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. उपचारासाठी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता

खुनाचा थरार मुलीच्या मैत्रिणींनी पाहिला

भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. मुलीवर वार करत असताना हा सर्व प्रकार मुलीच्या मैत्रिणींनी व प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पाहिला आहे. कसलीही भीती न बाळगता आरोपीने मुलीची हत्या केल्यामुळे या परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी बिबेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून गुन्हे शाखेसह बिबवेवाडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.