बीडमध्ये बस चालकाची गळफास घेऊन आत्महत्या
बीड : डोळ्यात तेल ओतून प्रवाशांना आपल्या लालपरीत, सुखरूप पोहोचवण्याचं काम करणाऱ्या एसटी बस चालकाने आत्मत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बीड मध्ये समोर आला आहे. आर्थिक विवंचनेतून आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
तुकाराम सानप असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. सानप यांना दोन मुले आहेत. घरात किराणा नाही, महावितरणने गेल्या 15 दिवसांपूर्वी घराचे वीज कनेक्शन कट केले. त्यात आधिच कमी पगार जो आहे तो पण वेळेवर मिळत नाही. त्यामुळे सानप यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्याने सांगितले आहे.
तुकाराम सानप यांनी काल दिवसभर नियोजनानुसार रंजेगाव येथील बसच्या फेऱ्या केल्या होत्या. घरी गेल्यानंतर त्यांनी अंकुश नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊ आत्महत्या केली. नियमानुसार बस कर्मचाऱ्यांचा पगार 7 तारखे पर्यंत होत असतो. परंतु या महिन्यात अजून सुद्धा पगार झालेला नाही. यामुळे सध्या बस स्थानकातील कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करण्याची वेळ आली.
या आधीही दोन बस चालकांनी आत्महत्या केल्या आहेत. महामंडळचे कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत हे यावरून दिसून येत आहे. आत्महत्येचे हे सत्र चालूच आहे. मात्र सरकार गप्पच आहे. त्यामुळे आणखी किती कर्मचाऱ्यांचा बळी जाणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!