रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास अटक; पिस्तूल आणि काडतुसे जप्त

पिंपरी चिंचवड : रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला आळंदी पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 4 पिस्टल व 4 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. सोमनाथ प्रकाश पाटोळे (वय 27 रा सोळू ता खेड जि पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी मध्ये 1 वर्षाचा
तडीपार कालावधी पुर्ण करुन आलेला सराईत आरोपी सोमनाथ प्रकाश पाटोळे हा सोळू गावातील दर्याचे जवळ आला असुन त्यांचा पाठीवर असलेल्या सँगमध्ये पिस्टल असुन तो सध्या पिस्टल विक्रीचा विक्रीचा व्यवसाय करत आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.  त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या सँगमध्ये एकुण 1 लाख 22 हजार रुपये किंमतीच्या 4 पिस्टल व 4 जिवंत काडतुस मिळुन आल्याने ते जप्त करत पोलिसांनी त्याला अटक केली.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. महेश शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 मंचक ईप्पर , सहा. पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कटे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर सागळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी पोलीस स्टेशन, पोलीस उप निरीक्षक जोंधळे, आर.एम.लोणकर, बी.बी. सानपपो बी. व्हि. खेडकर,  एन. के. साळुखे,  के. सी. गर्जे, जी. व्हि. आढे यांनी केली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.