नाशकात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; 500 रुपयांच्या 291 बनावट नोटा जप्त

नाशिक : नाशिकमध्ये बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा लासलगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका महिलेसह पाच जणांना सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून 500 रुपयांच्या 291 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

मोहन बाबुराव पाटील, प्रतिभा बाबुराव घायाळ, विठ्ठल चपांलाल नाबरीया, रविंद्र राऊत, विनोद पटेल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

लासलगाव परिसरात नकली नोटा चलनात आणल्या जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता आरोपी विनोद मोहनभाई पटेल हा त्यांचा कडील इटीऑस कारमध्ये आले असता छापा टाकुन त्यांच्याकडुन 500 रुपयांच्या बनावट 291 नोटा आणि इटीऑस कारसह सुमारे 4,00,000 रुपयांचा मुद्‌देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.