पिंपरीतील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघींची सुटक

पिंपरी चिंचवड : पिंपरीत वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून देह व्यापार करुन घेणाऱ्या महिलेच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरीतील वेलनेस स्पा सेंटरमध्ये  मंगळवारी (दि. 12) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

महिला आरोपी (वय 38, रा. तापकीरनगर, काळेवाडी) च्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुबराव गवारे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी मधील डिलक्स मोबाईल मार्केट मॉलच्या पाचव्या मजल्यावर वेलनेस स्पा सेंटर आहे. या स्पा सेंटरमध्ये आरोपी महिला दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई करत दोन महिलांची सुटका केली. तसेच स्पा सेंटर चालवणा-या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.