पुण्यात डोक्यात दगड घालून एकाचा खून ; मृतदेहाच्या अंगावरील पॅन्ट काढून आरोपी पसार

पुणे :औषध आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. ही घटना सिंहगड रोडवरील रामकृष्ण मठाच्या मागील बाजूला कॅनॉल रोडजवळ मंगळवारी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजण्याच्या दरम्यान घडली.

योगेश अंकुश भोकरे (वय ३८, रा. गल्ली नं. २३, जनता वसाहत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आदिती योगेश भोकरे यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश भोकरे हे टेलर म्हणून काम करत होते. काल सायंकाळी ते रात्री 7 वाजण्याच्या सुमारास औषध आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. रात्री उशिरा झाला तरी पती न आल्यामुळे त्याच्या पत्नी चिंचेत होत्या. त्यानंतर रात्री 10
वाजण्याच्या सुमारास जनता वसाहतीतील रामकृष्ण मठाच्या पाठीमागे कॅनॉल रोडवर योगेश भोकरे यांचा मृतदेह सापडला.
अतिशय निघृणपणे त्यांचा खून करण्यात आला होता. ओळख पटू नये म्हणून दगडाने त्यांचा चेहरा ठेचण्यात आला होता. तर आरोपीनी जाता जाता त्यांची पॅन्ट देखील काढून नेली.पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.