पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ; मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रकार उघडकीस

पुणे : पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लष्करातील एका लेफ्टनंट कर्नल महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आज सकाळी आज सकाळी वानवडी परिसरात उघडकीस आली आहे.  याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.

रश्मी आशुतोष मिश्रा (वय ४३, रा. डेहराडुन) असे आत्महत्या केलेल्या महिला अधिकार्‍याचे नाव आहे. कौटुंबिक वादातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे

मिळालेल्या माहितीनुसार,पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुल हे महाराष्ट्रातील एक अतिशय लोकप्रिय कॉलेज आहे. या संस्थेची स्थापना १९५० मध्ये करण्यात आली आहे. येथील संस्थेत ९ वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जातात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.

जयपूर येथे नेमणुकीस असलेल्या लेफ्टनंट कर्नल रश्मी मिश्रा या आर्मीच्या ट्रेनिंगसाठी पुण्यात आल्या होत्या. नेहमीप्रमाणे सकाळी चहावाला रूमवर आला होता. मात्र आतमधून कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद आला नाही. त्यानंतर तेथील कर्मचार्‍यांना त्याने सांगितले. त्यावर दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला असता रश्मी मिश्रा यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.

रूमची पाहणी केली असता, मोबाईल एका बाजूने ठेवण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा अंदाज आहे. तो मोबाईल स्वीचऑफ असल्याने शोध सुरू आहे. तसेच लेफ्टनंट कर्नल रश्मी मिश्रा यांचे पती लष्करात कर्नल पदावर कार्यरत आहेत. तर वडीलही लष्करी अधिकारी आहेत. रश्मी मिश्रा आणि पतीचे घटस्फोटाचे प्रकरण प्रलंबित आहे, अशी माहिती समोर येत असल्याचे वानवडी पोलिसांनी सांगितले.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.