बिबवेवाडीतील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन मुलासह चौघांना अटक ; तिच्यावर केले तब्बल 44 वार

पुणे : बिबवेवाडीत एकतर्फी प्रेमातून एका 14 वर्षीय मुलीवर कोयत्याने सपासप वार करुन मंगळारी खून करण्यात आला होता. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस आणी गुन्हे शाखेने चारही आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. यातील मुख्य आरोपी वगळत इतर तीघेही अल्पवयीन मुले आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. शवविच्छेनदन अहवालात मुलीवर धारदार शस्त्राने तब्बल 44 वार झाल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले

ऋषीकेश उर्फ शुभम बाजीराव भागवत(वय 22,रा. सुखसागरनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. क्षितीजा अनंत व्यवहारे(वय 14) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. आरोपी शुभम हा तीच्या नात्यातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,शुभम भागवत हा क्षितिजा व्यवहारे हिचा नातेवाईक आहे. तो सुखसागरनगरला मावशीकडे राहून मिळेल ती कामे करत होता. तो क्षितिजा हिला गेल्या दीड वर्षांपासून त्रास देत होता. ही गोष्ट क्षितिजाच्या पालकांना समजल्यावर त्यांनी शुभम याला समज दिली होती. त्यानंतर तो चिंचवडला रहायला गेला होता.

त्यानंतर काल सायंकाळी तो एका अल्पवयीन साथीदारासह दुचाकीवर बिबवेवाडी परिसरात आला. तर दुसरे दोन अल्पवयीन साथीदार ओला कॅबमधून शस्त्र असलेली सॅक घेऊन बिबवेवाडीत आले. यश लॉनच्या पायथ्यापासून शुभसह दोघे दुचाकीवर यश लॉनपाशी आले. तीथे शुभमने तीला कब्बडी खेळत असलेल्या ठिकाणाहून बाजूला घेतले. तीथे वाद झाल्यावर, त्याने चाकू काढून तीचा गळा चिरला तर त्याच्या साथीदाराने कोयत्याने तीच्यावर सपासप वार केले. तीची एक मैत्रिण तीला सोडवण्यास आली असता तीच्या कपाळाला सोबल आणलेले खेळण्यातील पिस्तुलाने त्यांना धाक दाखवत हत्यारे तेथेच टाकून ते पळून गेले होते.या प्रकारानंतर आरोपी जवळच्या झुडपात रात्रभर लपून बसले होते. बिबवेवाडी पोलिसांनी त्यांना पहाटे या झाडाझुडपातून शोधून पकडले आहे.

-मोबाईल विकून खरेदी केली शस्त्र –

शुभम भागवतने मोबाईल विकून दोन तलवारी खरेदी केल्या होत्या. तसेच एक कोयता अगोदर घेऊन ठेवला होता. तो चालवत असलेल्या रोल पॉईंट स्नॅक सेंटरमधील एक धारदार चाकूनी त्याने सोबत घेतला होता. कोणी प्रतिकार करु नये म्हणून सोबत मिरचीची पुडही घेतली होती.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.