लोकांना दहशतीखाली ठेवणा-या सराईत गुन्हेगार १ वर्षासाठी स्थानबध्द ; लोणीकंद पोलीसांची कारवाई

पुणे : लोकांना दहशतीखाली ठेवणा-या मांजरी येथील सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी  दिले आहे.अभिजीत महादेव कांबळे (वय २४ वर्षे, रा. ७२ घरकुल मांजराई नगर मांजरी बु. पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अभिजित कांबळे याने त्याच्या साथीदारांसह लोणीकंद व हडपसर परिसरात कोयता, चाकूसारखी हत्यारे घेऊन फिरत असताना खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, जबरी चोरीसह दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे अशासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षात त्याच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत.

तसेच आरोपी अभिजीत कांबळे हा मांजरी तसेच आसपासच्या भागात कायम लोकांना दहशतीखाली ठेवुन त्यांना वारंवार त्रास देत असे. त्यामुळे सदर परिसरातील रहीवाशी दडपणाखाली वावरत होते, सदर आरोपी इसमामुळे वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु लागल्याने सदर आरोपीवर पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख, सहा. पोलीस आयुक्त किशोर जाधव,लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे  राजेश तटकरे, यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, पोलीस अंमलदार सागर कडु, तुषार पवार यांनी सदर सराईत इसम याचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर आरोपीवर महाराष्ट्र महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई होणेबाबत पोलीस आयुक्त पुणे शहर यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर आरोपीवर  महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाईचा आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, शहर यांनी काढला असुन त्याची बजावणी सदर आरोपीस करण्यात आली असुन त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे स्थानबध्द करण्यात आले आहे

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गेल्या वर्षभरात ४३ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.