सुनेच्या छळ केल्याप्रकरणी पिंपरी राष्ट्रवादीच्या माजी महापौरासह पाच जणांवर गुन्हा
पुणे : सुनेला दमदाटी करूनशिवीगाळ व मारहाण करत तिचा छळ केला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम यांच्यासह पाच जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार संभाजीनगर, पुणे येथे २९ मे २०२१ ते २५ जून २०२० या कालावधीत घडला.
कुशाग्र कदम, मंगला कदम, अशोक कदम, गौरव कदम, स्वाती कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी आणि कुशाग्र या दोघांचा विवाह 29 मे 2011 रोजी विवाह.झाला. लग्न आणि रिसेप्शनसाठी फिर्यादी यांच्या वडिलांनी 50 लाख रुपये खर्च केला. लग्नाच्या काही वर्षानंतर पतीला लग्नापूर्वीपासून गंभीर आजार असल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. ही बाब आरोपींनी फिर्यादी यांच्यापासून लपवून ठेवली. उलट डॉक्टर सोबत संगनमत करून
फिर्यादी यांना आजार असल्याचे सांगितले. तसेच आयव्हीएफ उपचार पद्धतीने मूल होण्यासाठी फिर्यादी महिलेवर प्रयोग केला. फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!