“आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, दाबणारा कधीच जन्माला येणार नाही”

मुंबई : दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा यंदा कोरोना काळात बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित होत आहे. आपला आवाज कोणी दाबू शकत नाही, आपला आवाज दाबणारा जन्माला यायचाय, अशी सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. भाषणाच्या सुरुवातीपासूनच मुख्यमंत्र्यांनी भाजपला लक्ष्य करायला सुरुवात केली.

मी पुन्हा येणार म्हणणारे आता म्हणतायेत मी गेलोच नाही. नाही गेलो तर मग बसा तिथेच. मला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटू नये? असा टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, मला कल्पना आहे बऱ्याच दिवसांनी आपल्याला वाव मिळाला आहे. आवाज आपला कुणी दाबू शकत नाही. आवाज दाबणारा जन्माला येऊ शकत नाही. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना दसरा आणि विजया दशमींच्या शुभेच्या देतो. मलाही बरं वाटलं. कारण मला बऱ्याच दिवसांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि बघिनी आणि मातांनो अशी हाक देता आली.

आपल्या सगळ्यांचे एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस असतो. शस्त्रपूजन झाल्यानंतर मी माझ्या खऱ्या शस्त्रांची पुजा केली. आपल्यावर फुलं उधळली. ही माझी खरे शस्त्र आहेत. हे आशीर्वाद घेत अशताना माझ्या मनात नेहमी नम्र भावना असते. प्रत्येक जन्मी हेच आई-वडील, माझा कुटुंब-परिवाह हाच मिळायला पाहिजे. आणि महाराष्ट्रात जन्म व्हावला पाहिजे. आणि मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये. माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटो, अशी इच्छवर चरणी प्रार्थना आहे. कारण काही जणांना असं वाटतं जे बोलत होते पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. बस आहे तिकडेच. पण जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते. पदं आणि सत्ता काय आहेत? पदं येतील जातील. पण कधीही अहमपणा कधी डोक्यात येऊ देऊ नको. ज्यादिवशी डोक्यात हवा जाईल, त्यादिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे.

आजचा हा क्षण आपल्या आयुष्यात फार महत्वाचा व मोलाचा आहे. सुवर्ण क्षण असतो हा. जी परंपरा शिवसेना प्रमुखांनी १९६६ मध्ये सुरू केली. ती समर्थपणे तुमच्या सर्वांच्या सोबतीने आपण पुढे नेत आहोत, याचा मला अभिमान आहे. माझ्यासाठी हा क्षण आणि हा दिवस आपल्या सगळ्यांचे एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठीचा असतो. आपण पाहिलं असेल, शस्त्रपुजन झाल्यानंतर मी माझ्या खऱ्या शस्त्रांची पुजा केली, आपल्यावर फुलं उधळली. ही माझी खरी शस्त्र आहेत, ही शिवसेना प्रमुखांना मला दिलेली आहे. आणि हे आशीर्वाद घेत असताना, माझ्या मनात नेहमी एक नम्र भावना असते. हेच प्रेम सर्वप्रथम प्रत्येक जन्मी मला माझे हेच आई-वडील मिळाले पाहिजेत. माझं कुटुंब माझं परिवार हाच मिळाला पाहिजे. जन्मही महाराष्ट्रातच पाहिजे आणि मला स्वतःला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीही वाटू नये. मला तर सोडाच,पण माझ्या सर्व जनतेला देखील मी मुख्यमंत्री आहे असं वाटता कामा नये. मी तुमच्या घरातला कुणी तरी आहे तुमचा भाऊ आहे.असं वाटो ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे.”

विजयदशमी निमित्त दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा, करोनाची साथ नियंत्रणात आल्याने यंदा ऑनलाइनऐवजी थेट घेण्यात आला. मात्र,उपस्थितीच्या मर्यादेमुळे नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कऐवजी यंदाचा दसरा मेळावा हा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.