कोल्हापुरातील अल्‍पवयीन मुलीवर मुंबईतील पोलिसाचा अत्‍याचार

कोल्हापूर :  दहावीत शिकणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन 15 वर्षीय मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून मुंबई पोलीस दलात असलेल्या नात्यातीलच एका तरुणाने दोन वर्षे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुण हा विवाहित असून मुंबई पोलिसांत कार्यरत आहे. याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

राजेंद्र गणपती पाटील  (वय-28 रा. करंजफेन, ता. पन्हाळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अल्‍पवयीन मुलीवर मुंबईतील पोलिसाचा अत्‍याचार झाल्‍याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असतानाही आरोपीने पिडीत मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून जून ते ऑगस्ट 2021 या कालावधीत करंजफेन येथील उत्तम केरबा पाटील यांच्या घरात अत्याचार केले. तसेच आपल्यात झालेले कोणाला सांगायचे नाही अशी धमकी देखील आरोपीने दिली.

दरम्यान,पीडित मुलीची मासिक पाळी न झाल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेले. त्यावेळी ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मुलगी अल्पवयीन असल्याने हे प्रकरण सीपीआरमध्ये नोंद होऊन पन्हाळा पोलिसांकडे चौकशीसाठी वर्ग केल्यानंतर पन्हाळा पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याची चर्चा सुरू झाली होती. कोल्हापूरातील दवाखान्यात पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना समजल्यावर याची माहिती गुरुवारी (दि.14) देण्यात आली. पीडित मुलगी 10 वीत शिकणारी आहे. सध्या ती दोन महिन्यांची गरोदर आहे.
तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने आरोपीचे नाव सांगितले.

या प्रकरणातील आरोपी पोलीस असल्याने पोलिसांनी कारवाई करण्यात दिरंगाई केल्याची चर्चा आहे.पोलिसांनी गावातील लोकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.या जबाबात संबंधित पोलीस जुलैमध्ये गावी आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री उशिरा संशयीत आरोपी राजेंद्र पाटील याला पन्हाळा पोलिसांनी अटक केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.