दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंची चौफेर फटकेबाजी; सत्ताधाऱ्यांवर निशाणा तर आपल्याच पक्षाला घरचा आहेर

बीड :आज विजयादशमीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील भगवानगड येथे भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडून मोठ्या दसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाषणात पंकजा मुंडेंनी जनतेच्या हितासाठी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यावर  आवाज उठवणार असल्याचा इशारा सरकारला दिला.

भगवान गड येथील दसरा मेळाव्यासाठी प्रीतम मुंडे यांची रॅली मेळाव्याकडे रवाना झाली आहे. ठीकठीकाणी कार्यकर्ते या रॅलीचे स्वागत करत आहेत. माझ्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

या प्रसंगी बोलतांना पंकजा मुंडे म्हणल्या की, आज विजया दशमी आहे आणि भगवान बाबा यांच्या जन्म गावी आपण दसरा मेळावा साजरा करण्यासाठी एवढ्या मोठ्या संखेने उपस्थित जनसागर उसळला आहे.या जमलेल्या समुदयावरून पंकजा मुंडे यांनी पदर ओवाळून काढला. तर माझा जीव सुद्धा तुमच्यावरून ओवाळून काढेल असा शब्द पंकजा मुंडे यांनी जमलेल्या समुदायाला दिला. पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणल्या की हा मेळावा कोणता राजकीय मेळावा नाही तर सर्व जाती धर्माचा मेळावा आहे

तुम मुझे कब तक रोकोगे

मला वाटत होते हा मेळावा होतोच की नाही, अशी शंका उपस्थित झाली कारण सत्ता आपली नाही अशी कार्यकर्त्यांनी शंका दाखवली अतिवृष्टी आहे, पण मी म्हणले की जनतेला ऊर्जा देण्यासाठी हा मेळावा घेणे गरजेचे आहे सत्ता नसलीतर काय झाले भगवान बाबांच्या चरणी येण्यासाठी सत्तेची गरज नाही असे पंकजा मुंडे म्हणल्या.

पुढे बोलतांना म्हनाल्या की,सरकार कोणाचेही असू मी याठिकाणी कोणत्या प्रवृत्तीचा नाव घेणार नाही कारण ही पवित्र भूमी आहे.असे नाव घेता धनंजय मुंडे वर निशाण साधला, त्या पुढे बोलतांना म्हणाल्या की,मी आंदोलन केले आणि सरकारने बीड साठी पॅकेज जाहीर केले. आता काय बीड जिल्ह्याची अवस्था पालक मंत्र्यांनी दिले का काही बजेट जे चालू आहे ते केंद्राचे आणि ते जेव्हा विरोधो पक्षात हेते तेव्हा ते सतत धमक्या द्यायचे.

अरे यांनी आपले मंत्रिपद गहन ठेवले आहे असे नाव न घेता धनंजय मुंडे वर निशाण साधला. पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणल्या की, या सरकार मध्ये महिला सुरक्षित नाही या जिल्ह्यात सर्वत्र अराजकता पसरली आहे. याविरोधात मी आवाज उचलणार आहे असे बोलतांना म्हणल्या.

“रोज आमचा एक नेता उठतो आणि सरकार पडणार सांगतो

“मी माझ्या पक्षाच्या लोकांनाही सांगणार आहे. प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार पडणार आहे असं सांगतो. आणि प्रत्येक सत्ताधारी आमचं सरकार खंबीर आहे सांगतो. पण तुम्ही सरकार पडणार आणि नाही पडणार यातून बाहेर पडणार आहात की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतोय, सरकार पडणं आणि सरकार खंबीर असणं आमचं ध्येय नाही तर जनतेसाठी काय करतात ते सांगा. राजकारणातील गुन्हेगारीकरण संपुष्टात आणताना विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात रान उठवलं होतं तेव्हा सत्तापरिवर्तन झालं होतं. त्यामुळे विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी आपापल्या भूमिकेकडे आणि जनतेच्या भल्याकडे लक्ष दिलं पाहिजे,” असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं

भल्यासाठी ऊसतोड कामगार मंडळाची स्थापना केली मात्र

ऊसतोड कामगारांच्या भल्यासाठी ऊसतोड कामगार मंडळाची स्थापना केली मात्र म्हणावी तशी उभारणी या ठिकाणी झाली नाही मला माहित नाही का झाली नाही ते तीन पार्टी चे सरकार आहे . आणि या पक्षातील प्रत्येक नेता आपल्या आपल्याला सावरण्यासाठी आणि खुशी देण्यात मग्न आहेत. यांना जनतेच्या हितासाठी कधी काम करणार. यावेळी आपण सर्वजण संकल्प घेणार की, व्यसन मुक्ती साठी तंबाखू बंद करा हा संकल झालेल्या युवकांना दिला.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे

भाजपाच्या नेत्यांकडून वारंवार राज्य सरकार पडणार असल्याच्या वक्तव्यावरुन भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पक्षाला घऱचा आहेर दिला आहे. सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडा असं आवाहन करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला आहे. दसऱ्यानिमित्त भगवान गडावर आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांवर अत्याचर, बलात्कार होत आहेत…महिलांकडे वाकडी नजर करुन जरी पाहिलं तर डोळे काढून घेणाऱ्याची ही भूमी आहे. हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे” असंदेखील त्या म्हणाल्या

राज्यात काय चाललंय काय? त्यावर बोलायचं नाही…आरोपींवर बोलायचं नाही. सरकार जर असं काम करत असेल तर जाब विचारायचा की नाही?,” अशी विचारणा पंकजा मुंडेंनी केली. सरकारने नुसतं पॅकेज जाहीर करुन चालणार नाही, प्रत्येकाच्या हातात मदत द्यावी आणि दिवाळी गोड करावी. फक्त मोदींचे तेवढे पैसे येत आहेत. पण राज्य सरकारचे, पालकमंत्र्यांचे आले का? पण असं काही बोललं की यांना राग येतो. आता तुम्ही सत्तेत आहात तर तुम्हाला विचारणार ना…तुम्ही विरोधात होता तेव्हा तर धमक्या देत होतात,” अशी टीका पंकजा मुंडेंनी केली. “आता काय बीड जिल्ह्याची आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था आहे. एक रुपया तरी आहे का? माझ्याच योजना चालू आहे. आपलं मंत्रीपद भाड्याने देऊन टाकलं आहे यांनी. यांचं काहीच चालत नाही. आमचं म्हणणं आहे तुम्ही जनतेच्या हिताचं काम करा आम्ही जाहीर अभिनंदन करु,” असं म्हणत पंकजा मुंडेंनी निशाणा साधला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.