माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती असे आरोप करू नका : शरद पवार

पिंपरी चिंचवड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर भाजपनं जोरदार टीकास्त्र डागलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा होती, अस मतं मांडल. मात्र, यात त्यांनी चुकीचा आरोप केला.. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथील पत्रकार परिषदेत केले. यावेळी केंद्र सरकार कशा पद्धतीने यंत्रणांचा चुकीचा वापर करत आहे, याचा पाढाच पवारांनी वाचून दाखवला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला

पवार म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी सांगितलं की, काहीही करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मी जबाबदारीने सांगतोय. हे जे आघाडीचं सरकार झालं, ते बनवण्यात आमच्या काही सहकाऱ्यांचा हात होता. त्यात माझाही किंचित होता. माझाही किंचित सहभाग होता’, असं पवार म्हणाले.

‘ज्यावेळी सगळ्या आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत सरकारचं नेतृत्व कुणी करायचं, याबद्दल आमच्याकडे दोन-तीन नावं आमच्याकडे आलेली होती. उद्धव ठाकरे ती बाब मान्य करायला तयार नव्हते. ते माझ्या बाजूला बसले होते. उद्धव ठाकरेंचा हात धरला आणि वर केला आणि सांगितलं हेच होतील. त्यावेळी त्यांची हात वर करायची तयारी नव्हती. त्यांची मुख्यमंत्री व्हायचीही तयारी नव्हती. त्यांना सक्तीने मी हात वर करायला लावला. नंतर त्यांनी सांगितलं आणि ती गोष्ट सत्य आहे’, असं म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला उत्तर दिलं.

‘त्यांचा हात वर उचलत मी म्हटलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की, असे आरोप करू नका. हे योग्य नाही. स्वतः फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बरंच काही माहिती आहे’, असंही पवार म्हणाले.

यंत्रणेचा गैरवापर स्पष्टपणे दिसतोय

चौकशीचा अधिकार मला मान्य आहे. पण चौकशी केल्यानंतर काम संपल्यावर तिथे थांबू नये. पण बिचाऱ्या पाहुण्याचा दोष नव्हता. त्यांना वरुन आदेश होते. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्यासाठी हे पावलं टाकली जात आहेत. यंत्रणेचा गैरवापर स्पष्टपणे दिसतोय, असं पवारांनी सांगितलं. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. त्यांच्या घरी 5 दिवस 14 ते 15 लोकं छापेमारीसाठी गेले होते. त्याचं वागणं वाईट होतं असं नाही. त्याबद्दल तक्रार नाही. त्यांना हाती काही लागलं नाही तरी त्यांना तिथे थांबवण्यात आलं. ते बिचारे शांतपणे पुढील आदेश येईपर्यंत बसून राहिले. मध्यमवर्गीय माणसाच्या घरी असं पाच -पाच दिवस येऊन राहणं किती योग्य आहे? असा सवाल पवारांनी केला.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या इतर नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली किंवा आरोप केल्यानंतर लगेच तपास यंत्रणांकडून कारवाया केल्या जात आहेत. हा काय प्रकार आहे? राज्यात हे पहिल्यांदाच घडत आहे, असंही त्यांनी सांगितलं. शिवाय अजित पवारांच्या बहिणींच्या घरी जाऊन आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. तिथे जाऊन मी चौकशी केली. कागदपत्र पाहिली. त्यातून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. त्यांच्या घरी 5 दिवस 14 ते 15 लोकं छापेमारीसाठी गेले होते. त्याचं वागणं वाईट होतं असं नाही. त्याबद्दल तक्रार नाही. त्यांना हाती काही लागलं नाही तरी त्यांना तिथे थांबवण्यात आलं. ते बिचारे शांतपणे पुढील आदेश येईपर्यंत बसून राहिले. मध्यमवर्गीय माणसाच्या घरी असं पाच -पाच दिवस येऊन राहणं किती योग्य आहे? असा सवाल पवारांनी केला

गुन्हेगारांना सोबत घेऊन कारवाई 
अमली पदार्थाची एक यंत्रणा आहे, जी आजवर कोणाला माहिती नव्हती. नवाब मलिकांच्या नातेवाईकांसोबत काय घडतंय. त्यांच्यावर दबाव आणतायेत. ते केंद्रावर बोलतात, म्हणून त्यांच्यावर हल्ला करता येत नसल्याने त्यांच्या जावयाला अटक केली. नवाब मलिक यांच्या जावयाकडे गांजा सापडला म्हणून अटक केली होती. पण संबंधित तज्ञ मंडळींनी हा गांजा नसून एक वनस्पती आहे, असं सांगितलं. मग न्यायालयाने जामीन दिला. पण यामुळं तुरुंगात अडकून रहावं लागलं. अमली पदार्थ पथकाने दोन साक्षीदार आणले, त्यात एक गुन्हेगार असल्याचं समोर येतंय. नवाब मलिक यांच्या जावयाला अटक करताना एक पंच आणला. तो पंच गुन्हेगार असल्याचं समोर आलं. पण तेव्हापासून तो गायब आहे. पुणे पोलिसांनी त्याच्यासाठी वॉरंट काढलं आहे. म्हणजे हे गुन्हेगारांना सोबत घेऊन कारवाई करतात. गुन्हेगारांना सोबत घेऊन कारवाई करायची आणि चांगल्या लोकांना अडकवायचं, हेच धोरण या यंत्रणेचे दिसते.

..तर भाजपचे नेते खुलासा द्यायला पुढे येतात
यंत्रणेवर आरोप केला तर भाजपचे नेते खुलासा द्यायला पुढे येतात. त्या यंत्रणेच्या प्रमुखांनी उत्तर दिलं तर समजू शकतो, पण भाजप जर त्यावर बोलत असेल. तर याचा स्वच्छ अर्थ आहे की भाजप ह्यांना चालवतं. महाविकासआघाडी सरकार ढासळत नसल्याने, भाजप अस्वस्थ आहे. त्यामुळं राजकीय आकसाने हे होतंय. केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले होते की, ‘मला असं वाटतं की, आता तरी उद्धवजींनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे आणि हे मान्य केलं पाहिजे की, मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती; ती त्यांनी पूर्ण केली. राजकारणात महत्त्वाकांक्षा असणं हे चुकीचं नाहीये. पण ती लपवून त्याच्या पाठीमागे तत्वज्ञान उभं करणं हे मात्र चुकीचं आहे’, असं फडणवीस म्हणाले होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.