अहमदनगनर : किरकोळ कारणातून डोक्यात दगड घालून तरुणाचा खून
अहमदनगर : लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून एकाचा भरदिवसा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. वाळकी (ता.नगर) गावातील मुख्य चौकात रविवारी (ता.17) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.या घटनेमुळे वाळकी पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आ
जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वाळकी गावामध्ये एकाच गल्ली राहत असलेल्या लहान मुलांमध्ये सायकली लावण्यावरून सकाळीच किरकोळ वाद झाला होता. लहान मुलांमधील भांडणाचे लोण मोठयांच्या भांडणात पसरले. सकाळी दहा वाजता भांडण सुरू झाले. त्यावेळी ग्रामस्थांनी मध्यस्थी करत भांडण मिटविले होते. मात्र, त्यानंतर दुपारी पुन्हा भांडण पेटले. जोरदार हाणामारी सुरू झाल्याने घोळक्यात एकटाच सापडलेला जावेद तांबोळी याने आपली जीव वाचविण्यासाठी पळ काढला. मात्र, आरोपींनी त्याचा पाठलाग करत येथील सेंट्रल बॅंकेसमोर त्याच्या डोक्यात दगड टाकला. यात तो बेशुध्द पडला. त्यांना नगर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांना मयत घोषित केले.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले. कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या संदर्भात तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!