फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘काम’ देण्याच्या आमिषाने पुण्यातील 31 वर्षीय विवाहीतेवर ‘लैंगिक’ अत्याचार

पुणे :  फिल्म इंडस्ट्रीमध्ये शॉर्ट फिल्ममध्ये काम देतो, असे आमिष दाखवून एका 31 वर्षीय विवाहीत महिलेला आपल्या वासनाची शिकार करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१७ पासून १६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत फिर्यादीच्या घरी आणि कोंढवा परिसरात सुरु होता.  याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

समीर बाळू निकम (वय ३२, रा. जिजाऊ बिल्डींग, नर्हेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एका ३१ वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर निकम हा यु ट्युबवर शॉर्ट फिल्म बनवितो. त्याने काही गाणीही बनविली आहेत. या शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादी यांच्याशी ओळख वाढविला. युट्युबवर बनविलेल्या शॉर्ट फिल्मची गाणी त्यांना दाखवून त्यात काम मिळवून देण्याचा बहाणा करुन त्यांच्याशी शारीरीक जवळीक साधली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण करुन वारंवार जबरदस्तीने बलात्कार केला. या त्रासाला कंटाळून त्यांनी शेवटी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.पोलीस उपनिरीक्षक खेतमाळस अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.