मोक्कयाच्या गुन्हयात फरार असलेल्या आरोपीला सोलापूरातून अटक

पुणे : मोक्कयाचे गुन्हयात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सोलापूर मधून अटक केली आहे.चेतन चंद्रकांत पवार (वय २७ वर्षे, रा. मेगा सिटी, एसएनडीटी कॉलेज जवळ, पौड फाटा, कर्वे रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील फरार आरोपींचा शोध घेत असताना खंडणी विरोधी पथकातील पोलिसाना माहिती मिळाली की मोक्कयाच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी चेतन पवार हा ओळख लपवून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे लपून बसला आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता आरोपी चेतन पवार हा अर्जुन नगर, ता. करमाळा जि. सोलापुर परिसरात राहत असुन कमलाई स्नॅक्स सेंटर, कुर्डवाडी रोड, मौजे. पांडे, ता. करमाळा, जि. सोलापुर येथे रोज सकाळी नाश्ता करण्यासाठी येत असल्याची माहिती प्राप्त झाली.

या माहितीच्या आधारे पोलीसांनी सदर ठिकाणी सापळा लाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी तपास केला असता त्याने त्याचे साथीदार नकुल श्याम खाड, अभिजीत तुकाराम येळवंडे, उमेश चिकणे यांच्या मिळून रविंद्र सखाराम तांगुडे यास जीवे ठार मारण्याच्याउ द्देशाने त्याचेवर गोळीबार केले बाबत कबुली दिलेली आहे. आरोपी चेतन चंद्रकांत पवार याने वर नमुद गुन्हा केल्याचे कबुल केल्याने वारजे पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह- आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे सहा.पोलीस आयुक्त गुन्हे-२ लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पो.निरी.विनायक वेताळ यांचे सुचनेप्रमाणे सहा.पो.निरी.संदीप
बुवा, पोलीस अंमलदार नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, नितीन रावळ यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.