लग्नाचे आमिष दाखवून गायिकेवर बलात्कार; फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पिंपरी चिंचवड : बँड व ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात गायिका म्हणून काम करणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्याचे फोटो व व्हिडीओ काढून बदनामी करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले. तसेच पतीसही जीवे मारण्याची धमकी दिली.  याप्रकरणी ऑर्केस्ट्रा चालकावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2019 पासून 17 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घडला.

बाळू शिवाजी गव्हाणे (वय-55, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित ४२ वर्षीय महिलेने याप्रकरणी रविवारी (दि. १७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला बँड व आर्केस्ट्राच्या कार्यक्रमांमध्ये गायिका म्हणून काम करतात. आरोपी बाळू गव्हाळे याचा ऑर्केस्ट्रा आहे. त्याने फिर्यादी यांना ऑर्केस्ट्रामध्ये गायिका म्हणून काम करण्यास घेतले. त्यांच्याशी जवळीक वाढविली.

ऑगस्ट २०१९ मध्ये आरोपीने फिर्यादीला कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलावून घेऊन हिंजवडी येथील एका लॉजमध्ये नेले. तेथे फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवत हिंजवडीतील लॉजवर घेऊन जात जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. याचे फोटो आणि व्हिडीओ काढून बदनामी करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले.तसेच अनेकवेळा अनेक लॉजवर व त्याच्या चिंचवड स्टेशन येथील ऑफिसमध्ये व हिंजवडी येथे अनेकवेळा घेऊन जाऊन वारंवार शरीरसंबंध ठेवले. फिर्यादीच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पीडित महिलेने याप्रकरणी भोसरी पोलिसांकडे फिर्याद केली. त्यानुसार, भोसरी पोलिसांनी फिर्याद नोंदविली असून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.