पिंपरी-चिंचवडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश ; 4 महिलांची सुटका

पिंपरी चिंचवड : वाकडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 18) चारच्या सुमारास सोनीगरा लॅन्डमार्क, कस्पटे वस्ती, वाकड, पुणे येथील Traco Treat Spa सेंटरमध्ये करण्यात आली. पीडित चार महिलांची सुटका करून स्पा सेंटर मालक आणि स्पा सेंटर मॅनेजरच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्पा सेंटर मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

रनवीर रामनरेश राठोड (वय 31 वर्षे रा. फ्लॅट नंबर 104, एन बिल्डींग फेज-02, तनिष्क आर्कीड, चहोली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने केलेल्या या कारवाईमुळे शहरातील स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या गोरख धंद्याचा पर्दाफाश झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनीगरा लॅन्डमार्क, कस्पटे वस्ती, वाकड, पुणे येथील Traco Treat Spa सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला.त्यावेळी आरोपी 4 महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या कडून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करवून घेत होते. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन रनवीर रामनरेश राठोड याला अटक केली.पुढील तपास वाकड पोलीस करीत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.