संपत्तीच्या वादातून मुलाने बायकोच्या मदतीने वडिलांवर केले ब्लेडने वार ; शिर्डीतील घटनेनं खळबळ..!!

शिर्डी : संपत्तीच्या वादातून मुलाने पतीच्या मदतीने वडिलांना ब्लेडच्या साहाय्याने गळ्यावर वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिर्डीत घडली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत मोठय़ा मुलासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंडाजी सूर्यभान गायके (वय 64, रा. पिंपळवाडी रोड, शिर्डी) असे जखमीचे नाव असून, संतोष कोंडाजी गायके व रेणुका संतोष गायके अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

कोंडाजी आणि संतोष यांच्यात संपत्तीवरून वाद होते. कोंडाजी यांची मुलगी उषा कातोरे हिचे 2013 मध्ये लग्न झालेले असून, तिनेही संपत्तीत हिस्सा मिळावा यासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. 13 ऑक्टोबर रोजी कोंडाजी हे घरात झोपलेले असताना, संपत्तीवरून संतोषने भांडण सुरू केले.

त्याची पत्नी रेणुकाने सासऱयाचे पाय दाबून धरले, तर संतोषने ब्लेडने वडिलांच्या गळ्यावर वार केले. आरडाओरडा ऐकून लहान मुलगा व सून तेथे आले असता, संतोषने त्यांनाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.